आजी माजी खेळाडूंनी दिल्या विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज २९ वा वाढदिवस आहे. त्याबद्दल अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याचा वाढदिवस संघासहकाऱ्यांबरोबर साजरा केला. त्याचे फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहेत आणि सर्वांना धन्यवाद म्हणाला आहे.

भारतीय संघाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे केक कापल्यानंतर विराटचा चेहरा केकने पूर्ण भरवण्यात आला होता. यावेळी काढलेले फोटो खेळाडूंनी विराटला शुभेच्छा देताना पोस्ट केले आहेत.

भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने ट्विटरवर शुभेच्छा देताना लिहिले आहे की ” “बदला नं १. वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार!” हार्दिकच्या वाढदिवसाला त्याला केकने पूर्ण भरवण्यात आले होते त्यामुळे त्याने विराटबरोबरचा केकने भरवलेला फोटो पोस्ट करून ‘बदला नं १’ असे लिहिले आहे. याबरोबरच संघातील बाकीच्या युवा खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषक २०११चा फोटो पोस्ट करून विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. व्ही व्ही एस लक्ष्मणनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच बीसीसीआयने एक व्हिडीओतुन विराटला शुभेच्छा दिल्या आहेत तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनींही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.