ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर !

इंदोर । भारता विरुद्धची वनडे मालिका ३-० ने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅशटन एगार दुखापतीमुळे मालिकेतील पुढील सामने खेळणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशी घोषणाही केली की उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाला दुसरा गोलंदाज देण्यात येणार नाही.

एगार हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. तिसऱ्या सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. संघाचे डॉक्टर रिचर्ड यांनी सांगितले की, सामना संपल्यानंतर त्याने एक्स-रे केला ज्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे असे दिसून आले. ऑस्ट्रेलियात परतल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.

अॅशटन एगारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ कसोटी, ४ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावे ९ विकेट्स आहेत तर वनडेमध्ये ४ आणि टी-२० मध्ये १ विकेट आहे. आता अॅशटन एगारच्या जागी कर्णधार स्टीव्ह स्मिथला अॅडम झम्पाला संघात स्थान दयावे लागणार. गुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.