श्रीशांतला करायचे २०१८च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुनरागमन तर

केरळ हायकोर्टाने बीसीसीआयला काल शंतकुमारन श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला. गेल्या चार वर्षांपासून श्रीशांत मैदानात उतरला नाही आणि आता तो पुन्हा देशासाठी खेळण्याचे स्वप्न बघत आहे.

” माझ स्वप्न आहे की मी भारताकडून २०१९चा विश्वचषक खेळावा आणि मला हे ही माहित आहे की हे शक्य नाही. जर असे झाले तर तो एक चमत्कार असेल पण माझा चमत्कारांवर पूर्ण विश्वास आहे.” असे श्रीशांत म्हणाला.

श्रीशांतचे सध्या वय आहे ३४ वर्ष. जर तुझे सध्या वय ३४ आहे तर तू क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यास उत्सुक कसा काय आहे ? असे विचारले आता श्रीशांत म्हणाला,” मी जर स्वतःला तंदरुस्त ठेवले तर मी ४० वर्षापर्यंत खेळू शकतो. सचिन, मिस्बा उल हक आणि युनिस खान हे खेळाडू त्याच्या चाळीशीनंतरही क्रिकेट खेळतच होते, त्यामुळे काहीही शक्य आहे.”