पहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित !

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांना चारचाकी भेट देऊन आश्चर्यचकित केले. गेल्यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणापासूनच बडोद्याच्या या २३ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटरने मैदानावर अविस्मरणीय कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

सर्व क्रिकेट प्रेमींना त्याच्या २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्याची फटकेबाजी लक्षात असेलच, त्याने भारताला बिकट परिस्तितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर सामना जिंकण्याची आशा ही दाखून दिली होती पण तो धावचीत झाला आणि भारताने सामना गमावला.

आधी टी२० स्पेसिऍलिस्ट म्हणून संघात आलेल्या हार्दिकने नंतर एकदिवसीय सामन्यातमध्येही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि यामुळेच त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने करत श्रीलंकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले.

आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबाबत मैदानावर तो आक्रमक वाटत असला तरी मैदानाबाहेर तो अगदी उलट आहे.

कसोटी मालिकेनंतर लगेचच हार्दिकने ट्विटरवर ट्विटची एक मालिका टाकली. त्यात त्याने एक व्हिडिओ टाकला ज्यात त्याने त्याच्या वडिलांना कार गिफ्ट केल्याचे दिसून येत आहे.

त्याचे वडील आणि मित्र एका गाडीच्या शोरूम मधून त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलने बोलत होते. तेव्हा त्याचा मित्र हार्दिकला सांगतो की वडीलांना ही गाडी आवडली आहे आणि हार्दिक समोरून म्हणतो की घेऊन टाका गाडी तर त्याचे वडील हसून म्हणता अशी कशी घेऊन टाका. तेव्हा तेथे शोरूमचा माणूस येऊन त्याना सांगतो की ही गाडी तुमचीच आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. हार्दिकच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलतात आणि ते खूप खुश होतात असे आपण व्हिडिओमध्ये दिसते.

त्यानंतर हार्दिकने भावुक होऊन काही ट्विट्स केले.