कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो

25 सप्टेंबरला एशिया कप 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानमधील सामना पार पडला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व केले होते. हा शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेला सामना अखेर बरोबरीत सुटला होता.

पण हा सामना बरोबरीत सुटल्याने स्टेडीयममध्ये सामना पहायला आलेल्या अर्जन सिंग एका चिमुकल्याला भारतीय चाहत्याला त्याचे अश्रू अनावर झाले. यावेळी त्या मुलाच्या वडिलांनी त्याला समाजावण्याचा प्रयत्न केले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.

पण आता त्याने त्याच्या रडण्यामागील कारण सांगितले आहे. त्याने एएनआयशी बोलताना सांगितले की ‘मी रडलो कारण धोनी त्याचा वनडे कर्णधार म्हणून शेवटचा आणि 200 वा सामना पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते.”

या सामन्यानंतर अर्जनला रडताना पाहुन भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही ट्विट केले होते. या ट्विटमध्ये‘काही नाही अंतिम सामना आपणच जिंकू’ अशा आशयाचे ट्विट त्याने केले होते.

हरभजनच्या या ट्विटला उत्तर देताना अर्जनच्या वडिल अमरप्रीत सिंग यांनी माहिती दिली की सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला फोन केला होता. ़

ते म्हणाले की “तो(लहान मुलगा) आता आनंदी आहे आणि आम्ही अंतिम सामनाही पाहणार आहोत. खरचं भुवनेश्वर कुमार चांगला आहे. त्याने त्याला फोन करुन समजावले आहे. आपण अंतिम सामन्यात नक्की पुनरागमन करु.”

एवढेच नाही तर अर्जनसोबत अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद शेहजादने सेल्फीही काढले आहेत.

अर्जनने त्या सामन्यातील शेवटच्या षटकामधील त्याच्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मला सामना आवडला. मला धोनी कर्णधार होता तेही आवडले. मी खूप आनंदी होतो. पण शेवटच्या चेंडूवर जडेजाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी क्षेत्ररक्षकाला बाउंड्रीजवळ पाहिले होते. नंतर त्याने जडेजाचा झेल घेतला आणि मला रडू आले.”

अर्जन हा त्याच्या पालकांसह बांगलादेश विरुद्ध भारत संघात झालेल्या अंतिम सामन्यासाठीही स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताने हा अंतिम सामना 3 विकेट्सने जिंकत सातव्यांदा एशिया कपवर नाव कोरले.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

आॅस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर असा पराक्रम करणारा भारत बनला तिसराच संघ

टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम

टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही