रोनाल्डो-मेस्सी टाय, २०१७चा बॅलन डी ओर पुरस्कार रोनाल्डोला !

काल फुटबाॅल जगतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार बॅलन डीओरचा वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगातील सर्वोत्तम ३० फुटबाॅल खेळाडूंना त्यांचा मागील वर्षीचा खेळ पाहून १ ते ३० असे स्थान देण्यात आले. हा पुरस्कार फ्रान्स फुटबाॅल आयोजित करते. या वर्षी रोनाल्डो या पुरस्काराचा मानकरी ठरला.

५ व्यांदा हा पुरस्कार जिंकत सर्वाधिक वेळा हा किताब आपल्या नावे करायच्या विक्रमाची बरोबरी केली. हा विक्रम आधी मेस्सीच्या नावे होता जो आता संयुक्त रित्या दोन्ही खेळाडूंच्या नावे आहे.

मागील १० वर्षात हा पुरस्कार रोनाल्डो किंवा मेस्सीच आपल्या नावे करत आले आहेत. २००८ साली रोनाल्डोने पहिला बॅलन डी ओर मिळवला होता. मागील वर्षी सुद्धा हा पुरस्कार रोनाल्डोला मिळाला तर या वर्षी रोनाल्डोला ९४६ तर मेस्सीला ६७० गुण मिळाले. ला लीगा, युएफा चॅम्पियन्स लीगसारख्या प्रमुख लीग जिंकुन रोनाल्डोने आधीच आपली दावेदारी मजबूत केली होती.

युएफाच्या विजेते पदात प्रमुख हातभार रोनाल्डोचाच होता. त्याने उप उपांत्य फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात गोल्स करत रियल मॅड्रिडला विजेतेपद मिळवून दिले. तर ला लीगामध्ये मॅड्रिडने बार्सिलोनापेक्षा १ सामना अधिक जिंकत लीगवर आपले नाव कोरले होते.

बॅलन डी ओर २०१७चे अव्वल १० खेळाडू:-
१०:- हेरी केन (टोट्टेन्हम हाॅटस्पर)
९:- राॅबर्ट लेवानडोस्की (बायर्न मुनिच)
८:- कान्टे (चेल्सी)
७:- मबाप्पे (पीएसजी)
६:-सर्जीओ रामोस (रियल मॅड्रिड)
५:- माॅड्रिक (रियल मॅड्रिड)
४:- बुफाॅन (जुवेंटस)
३:- नेमार (पीएसजी)
२:- मेस्सी (बार्सिलोना)
१:- रोनाल्डो (रियल मॅड्रिड)

# मबाप्पे पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.