रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे- मेस्सी

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे.

मागील नऊ वर्षापासून मेस्सी आणि रोनाल्डो ला लीगामध्ये एकमेंकाविरोधात खेळत होते मात्र आता रोनाल्डो जुवेंटसमध्ये गेल्याने तो आता इटलीच्या सेरी ए या स्पर्धेमध्ये खेळत आहे.

सध्या सुरू असलेल्या ला लीगामध्ये रियल आणि बार्सिलोनाने त्यांचे पहिले तीनही सामने जिंकले आहे. यामुळे दोन्ही संघ नऊ गुणांनी संयुक्तपणे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत.

“रियल हा एक चांगला संघ आहे, पण रोनाल्डोच्या जाण्याने त्या संघाला कमी महत्त्व आले आहे. तर चॅम्पियन्स लीगसाठी जुवेंटस आवडता झाला आहे”, असे मेस्सी एका कार्यक्रमावेळी म्हणाला.

“मला आश्चर्य वाटले की त्याने रियल सोडून जुवेंटसमध्ये जाण्याचे ठरवले. तसेच अनेक फुटबॉल क्लब्सना तो हवा होता मात्र त्याची निवड चांगली आहे”, असेही मेस्सी पुढे म्हणाला.

ऑगस्ट महिन्यातच मेस्सीने स्पष्ट केले होते की त्यांना या वर्षीची चॅम्पियन्स लीग जिंकायची आहे. मागील हंगामात ते उपांत्यपूर्व फेरीत एएस रोमाकडून पराभूत झाले होते.

बार्सिलोना २०१५मध्ये चॅम्पिसन्स लीगचा विजेता ठरला होता.

“मागील तीन हंगामापासून आम्ही या स्पर्धेच्या बाहेर पडत आहोत. पण रोमा विरुद्ध पराभूत होणे हे खूप वाईट होते” , असे मेस्सी म्हणाला.

सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चॅम्पिसन्स लीगच्या ब गटात असणाऱ्या बार्सिलोनाचे सामने इंटर मिलान, टोटेनहॅम हॉटस्पर, पीएसव्ही इंधोवेन यांच्या विरुद्ध आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वृद्धिमान सहाने ट्विट केलेल्या गमतीशीर फोटोवर स्टीव्ह स्मिथने दिली अशी प्रतिक्रिया…

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

मॅंचेस्टर युनायटेडचच्या मॅनेजरला कर बुडविल्याने तुरूंगवासाची शिक्षा