रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे.

2009 साली रियाल मॅद्रिदने रोनाल्डोला विश्वविक्रमी 728 कोटी रुपयात मॅंचेस्टर युनायटेडकडून आपल्याकडे खेचले होते.

रोनाल्डोमुळे मॅंचेस्टर युनायटेड आणि स्पोर्टिंग लिस्बन यांना 100 मिलीयन युरोच्या या कारारातून फायदा होणार आहे.

फिफाच्या नवीन यंत्रणेनुसार रोनाल्डो जरी जुवेंटसकडून खेळत असला तरी त्याच्या आधीच्याही क्लब्सना याचा आर्थिक फायदा होणार आहे.

जुवेंटसशी केलेल्या या नवीन कारारानुसार त्याला 30 मिलीयन युरो एवढी वार्षिक रक्कम मिळणार आहे.

फिफा विश्वचषकातून पोर्तुगलचा संघ बाद फेरीतूनच बाहेर पडला आहे.

तसेच त्याने सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात स्पेन विरूद्ध खेळाताना त्याच्या कामगिरीमधील आणि फिफा विश्वचषकातील 51वी हॅट्ट्रीक केली.

रोनाल्डोला मिळालेली रक्कम ही आताच्या फुटबॉलमधील सगळ्यात मोठा करार आहे. रियल माद्रीदच्या करारात त्याच्यासाठी 1 बिलीयन युरो एवढी रक्कम आहे यात जुवेंटसने बाजी मारली.

फिफाच्या नियमावलीप्रमाणे, 12 ते 23 वयोगटातील जे खेळाडू ज्या क्लब्ससाठी खेळले असतील त्यांनी 5% ट्रान्सफर फी त्या क्लब्सना द्यायची असते.

त्यामुळेच रोनाल्डोला 100 मिलीयन युरोमधील 5%  स्पोर्टिंग लिस्बन, मॅंचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगल या संघामध्ये वाटून दिले जाणार आहे.

त्याची विभागणी खालिलप्रमाणे,

मॅंचेस्टर युनायटेड – 2.5 मिलीयन युरो

स्पोर्टिंग लिस्बन – 2.2 मिलीयन युरो

पोर्तुगल – 248,000 युरो

स्पोर्टिंग लिस्बनकडून एक वर्ष खेळताना रोनाल्डो 2003ला मॅंचेस्टर युनायटेडच्या क्लबमध्ये सामील झाला. युनायटेडसाठी त्याने त्याची पहिली चॅम्पियन लीग आणि बॅलोन डीओर पुरस्कार मिळवला.

2009पासून रियल कडून खेळताना त्याने 4 चॅम्पियन लीगचे चषक जिंकले तर आणि 5 बॅलोन डीओर पुरस्कार मिळवले आहेत.