Video: रोनाल्डोच्या बायसिकल किकने जिंकली चाहत्यांची मने

रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या अफलातून खेळीसाठी प्रसीद्ध आहेच. पण काल त्याने बायसिकल किक मारून जो गोल केला त्याने प्रेक्षकानंच नाही तर सर्वच क्रीडा प्रेमींना चकित केले.

काल चॅम्पिअन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत रियल माद्रिदने जुवेंटस विरुद्ध ३-० असा विजय मिळवला आणि आठव्यांदा चॅम्पिअन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

रियल माद्रिदच्या ३ गोलपैकी २ गोल ५ वेळेचा बॅलन डी ओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोने केले. त्याने सामना सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला होता. त्यानंतर पूर्वार्धात जुवेंटसने रियालमाद्रिदला वर्चस्व राखण्यापासून रोखले. त्यामुळे पूर्वार्धापर्यंत सामन्याचा स्कोर १-० असाच होता.

उत्तरार्धात मात्र जुवेंटसने चेंडूवर ताबा राखण्यास सुरुवात केली त्यामुळे रियल माद्रिदवर दबाव वाढला. पण त्याचवेळेला रोनाल्डोने बायसिकल किक मारून गोल केला. त्याच्या या किकला प्रेक्षकांनीही उभे राहून दाद दिली.

तसेच रोनाल्डोच्या गोलमुळे रियालमाद्रिदला आघाडी घेण्यात यश आले. त्यानंतर मर्सिलोने तिसरा गोल करून रियल माद्रदला विजय मिळवून दिला

रोनाल्डोच्या या बायसिकल किकचे सर्वांनीच कौतुक केले आहे. याबद्दल रोनाल्डो म्हणाला, प्रेक्षकांकडून उभे राहून दाद मिळणे हा खूप अविश्वसनीय क्षण आहे. तसेच रोनाल्डोने त्याच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे हे सांगताना जुवेंटस चाहत्यांचेही आभार मानले आहेत.