फिफा विश्वचषक: अंतिम फेरीत पोहचलेल्या क्रोएशियाचा असाही एक कारनामा; ज्याची होतेयं मोठी चर्चा

मॉस्को।  क्रोएशिया हा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वाधिक कमी क्रमवारी असणारा देश आहे. 11जुलैला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला 2-1ने पराभूत केले.

या स्पर्धेतील क्रोएशियाची कामगिरी उत्तम झाली आहे. फिफा क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेला क्रोएशियाने 1998ला पहिला विश्वचषक खेळला होता. यामध्ये ते स्पर्धेत शेवटी तिसऱ्या स्थानावर होते.

या स्पर्धेत खेळणारा सगळ्यात छोटा देश अशी ख्यातीही क्रोएशियाने मिळवली आहे. त्यांची लोकसंख्या 4,000,000 एवढीच आहे.

क्रोएशियाने अर्जेंटीनाला 3-0ने तर नायजेरीया आणि आइसलंड या दोन संघाना पराभूत करून साखळी फेरीतील सगळे सामने जिंकले आहेत.

बाद फेरीत त्यांनी डेन्मार्कला पेनाल्टीत 3-2 आणि उपांत्यपूर्व फेरीत यजमान रशियाला पेनाल्टी शूट-आऊटमध्ये 4-3 असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

1-1 असा इंग्लंड विरुद्धचा सामना बरोबरीत असताना अधिक वेळ दिला गेल्याने त्यांचे सलग तिसऱ्यांदा पेनाल्टी करण्याचे कष्ट वाचले. स्ट्रायकर मारियो मॅंडझूकिकने 109व्या मिनीटाला केलेल्या गोलने क्रोएशियाचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के झाले.

हा विक्रम केला-

फिफाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचणारा क्रोएशिया हा पहिलाच देश आहे जो तीन सामन्यात 1-0 असा पिछाडीवर होता. डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंड या तीनही संघाने क्रोएशिया विरुद्ध गोल करून सामन्याला सुरूवात केली.

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15जुलैला क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स असा होणार आहे. या दोघांचा फिफामधील एकमेकांविरुद्धचा हा दुसरा सामना आहे. 1998च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 2-1ने हरवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

मागील 36 वर्षांपासून या क्लबचा किमान एकतरी खेळाडू फिफाचा अंतिम सामना खेळलाय