क्रोएशियाचा फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव

स्पेन संघाने युरो नेशन लीगमध्ये फिफा 2018च्या उपविजेत्या क्रोएशिया संघाचा 6-0 असा दारूण पराभव केला आहे. हा पराभव क्रोएशियाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

या सामन्यातील एक गोल रियल माद्रीदचा फॉरवर्ड मार्को असेनसियोने केले. तसेच त्याने या सामन्यात तीन गोल असिस्टही केले आहेत. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

क्रोएशिया संघाला मागच्याच आठवड्यात लॅकलस्ट्रे विरुद्धच्या मैत्रीपुर्ण सामन्यात 1-1 असा अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. फिफाच्या अंतिम फेरीत फ्रान्सकडून 4-2 असा पराभव स्विकारल्यावर स्पेन विरुद्धचा हा त्यांचा स्पर्धात्मक सामन्यातील पहिलाच पराभव ठरला आहे.

याआधी क्रोएशिया 2009ला फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेमब्लेला इंग्लंडकडून 5-1 असा पराभूत झाला होता.

लुका मोड्रीचला स्पेन विरुद्ध खेळलेल्या तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्रोएशियाला या पराभवातून वर येण्याची संधी आहे. त्यांना ऑक्टोबरमध्ये इंग्लंडचा सामना करायचा आहे.

तसेच या लीगमध्ये स्पेनने याआधी इंग्लंडलाही 2-1 असे पराभूत केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट

अॅलिस्टर कूकच्या कारकिर्दीचा शेवट गोड; जे सचिन, द्रविडलाही जमले नाही ते कूकने करुन दाखवले

हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती