चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची खास ट्रेन येतेयं पुण्यात

चेन्नई | आयपीएलमध्ये मोठा चाहता वर्ग असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची खास ट्रेन पुण्याला निघाली आहे. ही ट्रेन आज चेन्नईमधील सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून पुणे शहराकडे रवाना झाली. 

चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थानाने ह्या ट्रेनची तसेच तिकीटांची सोय चेन्नईमधील चाहत्यांना करून दिली आहे. यावेळी अनेक पिवळे झेंडे घेतलेले तसेच चेन्नईची जर्सी घातलेले चाहते चेन्नईमधील सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक२ वरून पुण्याकडे रवाना झाले. 

या ट्रेनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सुपर फॅन प्रभू, सरवनन हेही आहेत. त्यांच्यासाठी या विसलपोडू एक्सप्रेकमध्ये खास दोन बोगी देण्यात आल्या आहेत. 

यावेळी चेन्नई विरूद्ध राजस्थान सामना, जो चेन्नईत होणार होता त्याचे ज्या २० कट्टर  चाहत्यांनी तिकीट काढले होते त्यांना या ट्रेनमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

तसेच धोनी तसेच रैनाच्या वाढदिवसाला जे खास चाहते रक्तदान करतात तसेच अन्य उपक्रमात भाग घेतात त्या ७० चाहत्यांचाही यात समावेश आहे. एकूण १०००पेक्षा जास्त चाहते या सामन्यासाठी पुण्यात येत आहेत.

ही ट्रेन २४ तासात पु्ण्यात पोहचणार आहे.