IPL 2018- पद्मभुषण एमएस धोनीला चेन्नईकडून खास भेट!

यंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व करणारा एमएस धोनीला २ एप्रिलला पद्मभुषण पुरस्कार देण्यात आला.  याबद्दल  चेन्नई संघाने त्याचे हटके स्टाईल कौतुक केले.

यावेळी संघाने त्याच्यासाठी खास केक आणला होता. ज्यामध्ये धोनीचा राष्ट्रपती कोविंद यांच्यांकडून पुरस्कार स्विकारताचा फोटो होता.

हा फोटो चेन्नई सुपरकिंग्जचे व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन यांनी  ट्विटरवर पोस्ट केला. ” सीएसके परिवाराकडून  खास लोकांसाठी खास केक! ”  असे ट्विट पण त्यांनी केले आहे.

तसेच चेन्नई सुपरकिंग्ज नेहमीच धोनीचे वेगळ्या प्रकारचे फोटोज, व्हिडीअो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. धोनीमुळे सीएसकेला एक मोठा चाहता लाभला आहे.

ज्या दिवशी धोनीला पद्मभुषण पुरस्कार गौरविण्यात आले होते त्याच दिवशी योगायोगाने भारताने ७ वर्ष पहिले क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.