का दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..??

काल झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने १२४ धावांनी पाकिस्तानला मात दिली. पाकिस्तानने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी न केल्यामुळे भारतने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे कमी केलेल्या ४८ षटकांच्या डावात ३१९ धावा केल्या व डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाकिस्तानला ४८ षटकात ३२४ धावांचे आव्हान मिळाले.

भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतके ठोकली, ज्यात धवन, शर्मा, कोहली आणि युवराज यांचा समावेश होता. हा विक्रम भारताने तिसऱ्यांदा केला आहे, आणि तीनही वेळा युवराज या विक्रमाचा भाग होता. ४७ व्या शतकात जेव्हा युवराज हसन ला षटकार मारण्याच्या नादात पायचीत झाला तेव्हा सगळ्यांच्या नजरा पॅव्हिलियन कडे वळल्या, सर्वांची अपेक्षा होती की भारताचा माजी कर्णधार आणि जगातला बेस्टफिनिशर महेंद्रसिंग धोनी आता मैदानावर उतरेल पण असे झाले नाही. हार्दिक पंड्या मैदानावर उतरला. धोनीने पांड्याला संधी दिली असे सर्वांचे म्हणणे झाले आणि त्यानी त्याचे सोने केले. पंड्याने सहा चेंडूत वीस धावा ठोकल्या ज्यात शेवटच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूत ३ षटकार लगावले. धोनीला मागे ठेऊन पांड्यला संधी दिली आणि तो चालला म्हणून ठीक पण जर चालला नसता तर ?

या निर्णया बद्दल विचारले असता भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, पंड्याने सराव सामन्यात सुरेख फटकेबाजी केली होती त्यामुळे त्याला संधी देणे गरजेचे होते. सराव सामन्यात आणि आधी बऱ्याच वेळी पंड्याने आपण अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार मारू शकतो हे वेळोवेळी दाखवून दिले आहे म्हणून त्याला प्राधान्य देण्यात आले. पंड्याच्या संघातील निडवीबद्दल विचारले असता कोहली म्हणाला की पाकिस्तान फिरकी गोलंदाजाना चांगले खेळतात म्हणून अश्विनच्या जागी पांड्यला संधी दिली होती, तसेच पंड्या संघात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतो, आणि त्याने हे आज सिध्द देखील केले.