पिच क्युरेटरला हवी आहे पगारवाढ !

बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या विविध राज्य संघटनांच्या मैदानावर पिच क्युरेटर म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या प्रमुखांना पगारवाढ हवी आहे. हा पगार अतिशय कमी असल्याची ओरड पिच क्युरेटर नेहमीच होत असते परंतु यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर एका पिच क्युरेटरने ही मागणी केली आहे.

पुणे येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱया वनडे सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण भारतातील पिट क्युरेटर हादरले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवरून बऱ्याच पिच क्युरेटरने अशी माहिती दिली आहे की असा प्रकार घटण्यामागचे प्रमुख कारण आहे पिच क्युरेटरचा कमी पगार हेच आहे.

“मला खरच काही माहित नाही नक्की काय झाले. हा एक पिच क्युरेटरला काळिमा फासणारा प्रकार आहे. आम्ही सर्वांनी याबद्दल चर्चा केली आहे आणि आम्ही सर्वच आश्चर्यचकित आहोत. मी याबद्दल वाचले आहे आणि असे प्रकार प्रामुख्याने पैशांसाठी केले जातात. आता अशी चर्चा होत आहे की साळगावकरांनी हे का केले. प्रत्येक क्युरेटरला त्याच्या कामाबद्दल अभिमान आहे, पण आता त्यांचा पगार वाढवण्याची गरज आहे.” असे नाव न सांगण्याच्या अटीवरून एका पिच क्युरेटरने सांगितले.

देशभरातील पीच क्युरेटर्सचा मानधन हे बीसीसीआयकडून दिले जाते. तर प्रत्येक असोसिएशन १० ते १५ ग्राउंड्स मॅन म्हणजेच मैदानासाठी काम करणाऱ्या माणसांना पगार देते. खेळपट्टीवरील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही पिच क्युरेटरची असते तर पिच क्युरेटरबरोबर आणखीन पाच व्यक्ती काम करतात. पिच क्युरेटरचा महिन्याचा पगार ३५ हजाराच्या जवळपास असतो.

“बीसीसीआय क्रिकेटर्सला मोठे मानधन देते, पण आमच्याबरोबर असे काही घडत नाही. आम्ही या आधीही खूप वेळा आमची समस्या बीसीसीआयच्या बैठकीत मांडली आहे, पण त्याच्यावर काहीही निर्णय झाला नाही. दोन दशकांआधी ग्राऊंड्स मॅनला वर्षातून दोन महिन्यांची सुट्टी असायची पण आता आम्ही जवळजवळ वर्षभर काम करतो. पिच क्युरेटरचे काम हे खूप महत्त्वाचे असते पण आमच्या प्रश्नांबाबतीत कोणालाच काही पडलेले नाही.” असे एक पीच क्युरेटर म्हणाला.

बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्यानेही हे मान्य केले आहे की पिच क्युरेटरला पाहिजे तेवढे मानधन मिळत नाही, “त्यांनी त्यांच्या समस्या बराच वेळा बीसीसीआयच्या बैठकीत मांडल्या आहेत. पण त्यांना न्याय मिळाला नाही. बीसीसीआयकडून राज्य संघटनेला ग्राऊंड्स मॅनसाठी वेगळे पैसे दिले जात नाहीत. काही संघटना ग्राउंड्स मॅनला चांगला बोनस देते पण असे सगळीकडे होत नाही. मला माहित नाही साळगावकरांनी नक्की हे का केले, पण पिच क्युरेटरचा पगार ही एक मोठी समस्या आहे.”