विश्वचषक २०१९मध्ये तो खेळाडू १००% खेळणार, कोहलीने अप्रत्यक्षपणे केले स्पष्ट

इंग्लंड आणि वेल्समध्ये यावर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच संघ या विश्वचषकाच्या दृष्टीने तयारीला लागले आहे. तसेच या विश्वचषकासाठी भारताचा संघ काय असावा यावरही चर्चा रंगल्या आहेत.

त्याचबरोबर एका रिपोर्ट प्रमाणे रविंद्र जडेजा हा विश्वचषकासाठी भारतीय संघात असण्याची दाट शक्यता आहे. तो कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यासह तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून पर्याय असेल.

जडेजाने मागील वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेतून वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे प्रभावित झाले आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘जडेजा हा संघात असण्याची दाट शक्यता आहे. जरी त्याला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही तरी तो जर इंग्लंडमध्ये फ्लॅट आणि टर्न असणारी खेळपट्टी मिळाली तर महत्त्वाचा ठरु शकतो. तसेच हे देखील लक्षात घेतले पाहिजे की तो संघातील एकमेव डावखूरा फिरकी गोलंदाज आहे आणि विश्वचषकासारख्या मोठ्या कालावधीच्या स्पर्धेसाठी त्याची गरज आहे.’

‘जडेजामुळे तळातील फलंदाजीही भक्कम होईल. तो कदाचीत सर्व सामन्यात धावा करणार नाही. पण तो चांगली फलंदाजी करु शकतो. तसेच त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणाला विसरुन चालणार नाही. तो सहज 10-15 धावा वाचवू शकतो. या 10-15 धावा दबावाच्या सामन्यात महत्त्वाच्या ठरु शकतात.’

त्याचबरोबर या सुत्राने पुढे सांगितले की ‘अंतिम 11 जणांचा संघ निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जडेजा हा असा गोलंदाज आहे जो धावांना रोख लावतो, तर कुलदीप आणि चहल विकेट्स घेतात. प्रथम ध्येय हे विकेट घेणे असणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकात खेळणाऱ्या त्या ११ खेळाडूंबद्दल कोहलीचा मुद्दा गंभीरने खोडून काढला

तो महान खेळाडू म्हणतो, विराट वनडेतील सर्वात महान खेळाडू ठरणार

कॅप्टन कूल धोनी विरुद्ध किंग कोहली सज्ज