- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकलला स्क्वॅशचे रौप्यपदक

0 276

गोल्ड कोस्ट|  ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये महिला दुहेरीत जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकल कार्तिक या भारतीय जोडीने रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेतील स्क्वॅशमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले आहे.

चिनप्पा आणि दिपिका या जोडीची अंतिम लढत आज न्यूझीलंडच्या जोईले किंग आणि अमांडा लॅंडर्स-मर्फि या जोडी विरुद्ध होती.या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 2-0 ने पराभव केला.

भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या जेनी डनकाल्फ आणि लौरा मसारो यांचा 2-0 ने पराभव केला होता. पण आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यास ते अपयशी ठरले.

न्यूझीलंडने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावला नव्हता. हीच लय कायम ठेवताना न्यूझीलंडच्या किंग आणि लॅंडर्स-मर्फि या जोडीने सुवर्णपदक पटकावले.

याआधी जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकल कार्तिक या भारतीय जोडीने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंडच्या जेनी डनकाल्फ आणि लौरा मसारो यांचा पराभव करून एेतिहासिक सुवर्ण पदक पटकावले होते.

तसेच कालच्याच सामन्यात दिपिकाने सौरव घोसलच्या साथीने स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी रौप्य पदक मिळवले आहे.
 

Comments
Loading...
%d bloggers like this: