राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताला कांस्य पदक

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताच्या अंचता शरथ कमलने आज कांस्यपदक पटकावले.

अंचताने आज कांस्यपदकाची सामन्यात इंग्लंडच्या सॅम वॉल्करचा 4-1 (11-7, 11-9, 9-11, 11-6, 12-10)  ने पराभव केला.

हे अंचताने या स्पर्धेतील तिसरे पदक आहे. याआधी त्याने याच स्पर्धेत भारतासाठी पुरूष संघाकडून सुवर्ण आणि पुरूष दुहेरीत ज्ञानसेकरन सथियानच्या साथीने रौप्यपदक मिळवले होते.

आजच्या सामन्यात अंचताचे फोरहॅण्ड शॉट्स एवढे ताकदिचे होते की सॅमला ते खेळण्यास अवघड जात होते.  सॅम त्याचे शॉट्स खेळण्याचा खूप प्रयत्न करत होता. पण शेवटी अंचताने अधिक आक्रमकतेने खेळ करून कांस्य पदक जिंकले.

आतापर्यंत अंचतानी राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण सहा पदके मिळवली आहेत. यात चार सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यात २००६ ला मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत आणि पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक, तर दिल्लीला झालेल्या २०१० च्या राष्टकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि पुरुष सांघिकमध्ये कांस्य पदक मिळाले होते.

तसेच त्याला यावर्षी गोल्डकोस्टमध्ये पूरूष सांघिकमध्ये सुवर्णपदक आणि पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळाले आहे.

भारताने आतापर्यंत एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 22 कांस्य या पदकांचा समावेश आहे.