पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धेत सायबेज, परसिस्टंट संघाचे विजय

पुणे: वैभव महाडिकच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर मर्क्स संघाने पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत टीएटो संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. याचबरोबर इंडियन बँक, परसिस्टंट, सायबेज या संघांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १३० धावा केल्या. वैभव-राघव जोडीने  विजयी लक्ष्य १६.१ षटकांत पूर्ण केले. वैभव महाडिकने ५२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या, तर राघव त्रिवेदीने ४६ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. दुस-या लढतीत इंडियन बँक संघाने व्हेरिटास संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. परसिस्टंट संघाने डॉइश्च बँक  संघावर सात गडी राखून मात केली.

संक्षिप्त धावफलक –

१) टिएटो – २० षटकांत ६ बाद १३० (धनाजी कळके ३६, प्रशांत दुधाणे २२, गणेश आंब्रे २१, अंकित जैन नाबाद १५, अभिषेक राय २-१४, प्रसाद गिरकर १-२५) पराभूत वि. मर्स्क – १६.१ षटकांत बिनबाद १३१ (वैभव महाडिक नाबाद ८१, राघव त्रिवेदी नाबाद ४३).

२) व्हेरिटास – २० षटकांत ७ बाद १४४ (कपिल कुरळेकर नाबाद ३३, ललित शर्मा २५, विश्वजित उधाण २-२५, तुषार खिरिड २-२५, सुजित गायकवाड २-१७) पराभूत वि. इंडियन बँक – १८.४ षटकांत ४ बाद १४८ (अर्जुन शिंदे नाबाद ७७, विश्वजित नाबाद २३, सुमित दिघे २-१९, अमरित अलोक १-२८).

३) डॉइश्च बँक – १९.४ षटकांत सर्वबाद ११६ (संकेत शास्त्री ३१, प्रथमेश थोरात २०, हर्ष छाब्रा २०, अनुराग हंबिर ३-२८, अमरप्रीत जसपाल ३-१६, अमोल माने २-१६) पराभूत वि. परसिस्टंट – १६.२ षटकांत ३ बाद ११८ (कौस्तुभ काळे ४९, सिद्धार्थ गोखले ३९, सुधीर परांजपे नाबाद १०, राजशेखरण सी. १-३४, भंवरलाल भट्टी १-७).

४) सायबेज – २० षटकांत ५ बाद १८० (प्रतीक पंडित ६५, सौरभ रावल ५१, माझ शेख २१, अकिब पीरझादे ३-२४, अनिल पेनूगंटू १-३९, मुझमिल खान १-२४) वि. वि. झेन्सर – १७.५ षटकांत सर्वबाद ९० (भरत झव्हेरी ३९, अकिब पीरझादे १३, सौरभ रावल २-१४, निखिल गिरासे २-१६, राकेश शिंदे २-२७, प्रतीक पंडित २-०).

५) अटोससिंटेल – १९.५ षटकांत सर्वबाद १४१ (तन्मय पाडवे २७, अजितकुमार प्रधान २१, उज्ज्वल ठुसू १९, सचिन शेलार ३-२४, तनिष ठस्कर २-२९, अजय पाटील १-२७, केतन घाडगे १-२१) पराभूत वि. सीबीएसएल – १८ षटकांत ५ बाद १४३ (अतिफ ५०, मनीष ४१, सबिर शेख, अभिनव आनंद १-२१).