कबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण

दिल्ली | प्रो कबड्डीमधील दबंग दिल्ली संघाचा ट्रेनिंग कॅंप अर्थात सराव शिबीर डेहराडून येथे सुरु होणार आहे. येथील अभिमन्यु क्रिकेट अकादमीवर हे सराव शिबीर होणार आहे.

सध्या अनेक संघाचे खेळाडू हे प्रो कबड्डीच्या ५व्या हंगामासाठी तयारी करत आहेत. त्यात दिल्लीच्या व्यवस्थापनाने high-altitude डोळ्यासमोर ठेऊन डेहराडूनला सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी खेळाडू खास करुन फिटनेसवर भर देणार आहेत तसेच या काळात दबंग दिल्लीच्या आंतरशालेय कबड्डी चॅंपियनशिपमधील खेळाडूंशी संवाद साधणार आहे.

या शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांशी विशाल माने, शब्बीर बापु, रविंदर पहल आणि राजेश नरवाल हे दिग्गज खेळाडू संवाद साधणार आहेत.

१६ ते १८ आॅगस्ट या काळात होणारे दबंग दिल्लीच्या आंतरशालेय कबड्डी चॅंपियनशिपचे सर्व सामने दबंग दिल्लीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत.

दबंग दिल्लीच्या व्यवस्थापन हा खेळ अगदी तळगाळात पोहचावा म्हणुन प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणुन हे सामने डेहराडूनमध्ये होणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक

माजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी

आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली