विराट कोहलीची माफी मागत डेल स्टेनने केली निवड समीतीवर टीका

दक्षिण आफ्रिका संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामने होणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली.

या मालिकेतील टी20 मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनला संधी देण्यात आलेली नाही. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे. पण असे असतानाही दक्षिण आफ्रिका निवड समीतीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याची टी20 संघात निवड केली नाही.

त्यामुळे स्टेनने ट्विटरवरील एका चाहत्याला उत्तर देताना निवड समीतीवर टीका केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ख्रिस मॉरिसने या दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे सांगितले आहे. याबाबतीत नील मॅन्थॉर्प असे ट्विटर अकाउंटवर नाव असणाऱ्या एका चाहत्याने ट्विट केले होते. यावर उत्तर देताना स्टेनने ट्विट केले आहे की ‘मी उपलब्ध होतो. पण कोचिंग स्टाफच्या फेरबदलामध्ये माझा क्रमांक हरवला.’

त्यानंतर पुन्हा एकदा त्याने विराट कोहलीची माफी मागणारे ट्विट केले. यामध्ये त्याने म्हटले आहे की ‘विराट कोहली आणि करोडो लोक जे मी खेळेल असा विचार करत होते, त्या सर्वांची माफी मागतो. तूम्ही विचार केला पण त्यांनी केला नाही.’

स्टेन 2019 आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. पण त्याला दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. याच दुखापतीचा फटका स्टेनला 2019 विश्वचषकादरम्यानही बसला. त्याला एकही सामना न खेळता विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या टी20 संघात स्टेन प्रमाणेच फाफ डु प्लेसिसलाही संधी देण्यात आलेली नाही. या टी20 संघाचे कर्णधारपद क्विंनटॉन डी कॉक संभाळणार आहे. तसेच कसोटी संघाचे कर्णधारपद डु प्लेसिसकडे कायम ठेवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा हा भारत दौरा 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

भारत दौऱ्यासाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ – 

टी20 संघ – क्विंटन डी कॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर दसन (उपकर्णधार), तेंबा बावूमा, ज्युनियर डाला, बीजॉर्न फॉरच्यून, बोरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रीच नॉर्जे, अ‍ॅन्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, ताब्राईज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स.

कसोटी संघ – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), तेंबा बावूमा (उपकर्णधार), थ्यूनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमजा, केशव महाराज, एडेन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी एन्गीडी, एन्रिच नॉर्जे, वर्नोन फिलँडर, डेन पिडेड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची झाली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली

बरोबर २९ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा