शाॅन पोलाॅकपेक्षा १९ सामने कमी खेळलेला डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेचा नवा किंग

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान डेल स्टेनने खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात पहिल्या डावात सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडुवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज फकर जामनला बाद केले. ही स्टेनची कसोटी कारकिर्दीतील 422 वी विकेट होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेचा कसोटी क्रिकेटमधे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

त्याने शॉन पोलॉक यांच्या 421 विकेट्सला मागे टाकत हा पराक्रम केला आहे. हा पराक्रम स्टेनने त्याच्या 89 व्या कसोटी सामन्यात केला आहे.

याबरोबरच स्टेन हा कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 26 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेकडून एका कसोटी सामन्यात 10 विकेट्स सर्वाधिक वेळा घेण्याचा विक्रमही स्टेनच्या नावावर असून त्याने 5 वेळा अशी कामगिरी केली आहे.

तसेच स्टेनची जमान हा सेच्यूरियन मधील 57 वी कसोटी विकेट होती. सेंच्यूरियनमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रमही स्टेनच्याच नावावर आहे.

स्टेनने 2015 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला होता. पण त्यानंतर सतत दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे त्याने जूलै 2015 पासून फक्त 9 कसोटी सामने खेळले.

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 

422 विकेट्स – डेल स्टेन

421 विकेट्स – शॉन पोलॉक

390 विकेट्स – मखाया एनटिनी

330 विकेट्स – अॅलन डोनाल्ड

309 विकेट्स – मॉर्ने मॉर्केल

महत्त्वाच्या बातम्या:

स्टेन गन धडाडली; कुंबळे, वार्न व मुरलीच्या विक्रमाची बरोबरी

मयांक अगरवाल काही ऐकेना! केएल राहुलही आला टेन्शनमध्ये

कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत