दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. याआधीच या दोन्ही संघाच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दीक युद्ध सुरू आहेत. यातच दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननेही या मालिकेबद्दल आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे.

“भारतीय क्रिकेट संघ सतत दौरे केल्यामुळे थकला असल्याने त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवण्याची संधी कमी आहे. तसेच या दोन संघामधील इतिहास बघता ऑस्ट्रेलिया वरचढ ठरली आहे”, असे स्टेन म्हणाला.

भारतीय संघ मागील वर्षाच्या डिसेंबरपासून सतत विदेशात सामने खेळत आहेत. यामध्ये डिसेंबर-फेब्रुवारी मधील दक्षिण आफ्रिका, मार्चमधील श्रीलंका आणि जुलै-सप्टेंबर मधील इंग्लंड दौरा यांचा समावेश आहे.

भारताने जानेवारी-फेब्रुवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मर्यादित षटाकाच्या क्रिकेटमध्ये विजय मिळवला होता. तसेच इंग्लंड दौऱ्यातही चांगली कामगिरी केली होती.

“भारताच्या इंग्लंड दौऱ्याबद्दलही मी यजमान संघाकडूनच होतो. मात्र तेथे भारतीय गोलंदाजांची शैली बघून मला धक्का बसला”, असेही स्टेन म्हणाला.

भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 11 कसोटी मालिका खेळल्या असून त्यांना एकाही मालिकेत विजय मिळवता आला नाही. या मालिकेत एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले. यामध्ये भारताला फक्त 5 सामने जिंकता आले. 2014च्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 असे पराभूत व्हावे लागले होते.

या आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला अॅडलेडला खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी