दोन वर्षानंतर पुन्हा धडाडणार स्टेनगन

दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमधून सावरला असून 30 सप्टेंबर पासून चालू होणाऱ्या झिम्बाँबेविरुद्धच्या वनडे सामन्यात तो पुनरागमन करणार आहे.

स्टेन त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना 2 वर्षापूर्वी खेळला होता. आज झालेल्या संघ निवडीत त्याच्यासोबत लेग स्पिनर इम्रान ताहीरचे देखील पुनरागमन झाले आहे.

झिम्बाँबेविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी नवोदीत ख्रिस्टियन जाँकर याची देखील 16 सदस्यीय संघात निवड झाली आहे. भारताविरुद्धच्या टि20 सामन्यात त्याने 49 धावा केल्या होत्या.

स्टेनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2016 मध्ये खेळला होता. 2019 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेकडून खेळण्याचा त्याने मानस व्यक्त केला होता. त्यामुळे त्याला ही चांगली संधी आहे.  इम्रान ताहीरला श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती.

कॅराबियन प्रिमियर लीग 2018 मधील चांगल्या कामगिरीच्या आधारे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. क्विंटन डिकाँक आणि डेव्हिड मिलर यांना विश्रांती देण्यात आली आहे. फाफ डू प्लेसिस याचं नाव संघात असलं तरी तो दुखापातीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतरच खेळू शकेल.

टी-20 संघात दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. रॅसी वॅन डेर डसेन आणि गिहान क्लोयेटे या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज कागीसो रबाडाला विश्रांती देण्यात आली आहे.

ख्रिस्टियन जाँकरची निवड ही 2019 चा विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आल्याचे सीएसए च्या राष्ट्रीय निवड समितीने सांगितले. खाया झोंडो याची निवड देखील संघबांधणीच्या उद्देशाने करण्यात आल्याची सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून एमएस धोनीने सोडले कर्णधारपद

टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?