३ तासांत फलंदाजाकडून २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला

सिडनी | आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत वनडे सामन्यात डार्सी शाॅर्ट या फलंदाजाने १४८ चेंडूत तब्बल २५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात केली.

सध्या सुरु असलेल्या या सामन्यात क्विन्सलॅंड संघाने नाणेफेक जिंकत वेस्टर्न आॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्टर्न आॅस्ट्रेलियाचा जोश एलिंश ४ धावांवर बाद झाल्यावर डार्सी शाॅर्ट फलंदाज मैदानावर आला आणि सामन्याची सर्व सुत्रं त्याने आपल्या हाती घेतली.

तो जेव्हा ८व्या विकेटच्या रुपात बाद झाला तेव्हा त्याने १४८ चेंडूत तब्बल २५७ धावा कुटल्या होत्या. डार्सी शाॅर्टचा वेस्टर्न आॅस्ट्रेलिया ४७ षटकांत ३८७ धावांवर सर्वबाद झाला. या ३८७ मधील २५७ धावा एकट्या डार्सी शाॅर्टने केल्या होत्या. तर बाकी १० खेळाडूंनी मिळून १३० धावा केल्या.

डार्सी शाॅर्ट आणि संघातील दुसऱ्या सर्वोत्तम धावा करणाऱ्या खेळाडूंच्या धावांतील फरक हा तब्बल २३० धावांचा होता. मार्क्स स्टोनिकने या सामन्यात दुसऱ्या सर्वोत्तम धावा करताना केवळ २७ धावांची खेळी केली.

डार्सी शाॅर्ट आॅस्टेलियाकडून आजपर्यंत ३ वन-डे आणि १० टी-२० सामने खेळला आहे. त्याने फेब्रुवारी २०१८मध्ये टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

रोहित शर्माने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २६४ धावा केल्या आहेत. या अ दर्जाच्या क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वोच्च धावा आहेत. हा विक्रम आज थोडक्यात वाचला. यापुर्वी अॅलस्टेर ब्राॅऊन (२६८ धावा) २००२ मध्ये तर रोहित शर्माने (२६४ धावा) २०१४मध्ये केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळा रिशांक देवाडीगा करणार यूपी योद्धाचे नेतृत्व

एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश