पहा: त्या खेळाडूने ३८ पैकी ३६ धावा केल्या षटकाराने

काल कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स सामन्यात डॅरेन ब्रावोने चक्क सहा षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. त्याने खेळलेल्या १० चेंडूत ६ चेंडूवर त्याने षटकार, २ चेंडूंवर प्रत्येकी १ धाव तर २ चेंडू निर्धाव खेळले.

सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३ षटकांत १६३ धावांचे लक्ष त्रिबंगो नाईट रायडर्स संघासमोर ठेवले. सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्सच्या १६२ धावांमध्ये ९३ धावा एकट्या ख्रिस गेलने ४७ चेंडूत केल्या. त्रिबंगो नाईट रायडर्स संघाला डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ६ षटकांत ८६ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.

ब्रेंडन मॅक्क्युलम आणि डॅरेन ब्रावो यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे त्यांनी हे लक्ष फक्त ५.२ षटकांत पूर्ण केले. त्यात १४ चेंडूत ब्रॅंडोन मॅक्क्युलमने ४० धावा केल्या तर डॅरेन ब्रावोने १० चेंडूत ३८ धावा केल्या.

त्रिबंगो नाईट रायडर्सला १७ चेंडूत ५२ धावा लागत असताना ब्रॅंडोन मॅक्क्युलम आणि डॅरेन ब्रावो जोडीने पुढील १३ चेंडूंवर ६, ६, ६, ०, १, ०, ६, १, ४, ६, ६, ६ धावा केल्या.

पहिला षटकार

दुसरा षटकार

तिसरा षटकार

चौथा षटकार