डेव्हिड बेकहमच्या नवीन फुटबॉल संघाची घोषणा

इंग्लंड आणि रियल माद्रीदचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमने अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमधील त्याचा नवीन संघ इंटर मायामीची घोषणा केली आहे. तो या क्लबचा मालक आणि अध्यक्ष आहे.

बेकहमचा हा संघ 2020पासून लीगमध्ये खेळणार असून या संघाचे अधिकृत नाव ‘क्लब इंटरनॅशनल द फुतबॉल मियामी’ असे असणार आहे.

‘इंटर मायामी’ हे नाव जरी सेरी एच्या ‘इंटर मिलॅन’ सारखे वाटत असले तरी हे मायामी या शहरावरून ठेवण्यात आले आहे.

“हा दिवस माझ्यासाठी आणि संपुर्ण संघासाठी खुप गौरवाचा आहे. तसेच चाहत्यांसाठी नवीन संघाची घोषणा करणे ही सन्मानाची बाब आहे”, असे बेकहम म्हणाला.

तसेच यावेळी क्लबच्या लोगोचेही अनावरण झाले आहे. मायामीच्या या लोगोमध्ये गुलाबी, पांढरा आणि काळा रंग वापरला असून त्यात दोन बगळे एकमेंकाकडे पाठकरून उभे आहेत तसेच त्यात सुर्यही आहे.

क्लबचे ध्येय ‘लिबर्टाज, युनिटाज, फॉर्च्युना’ असे असून त्याचा अर्थ ‘स्वातंत्र्य, एकता, सामावून घेणारे, आणि उत्तम नशीब असा होतो.

“मायामी शहराकडून आणि चाहत्यांकडूनच आम्हाला बळ मिळाले आहे”, असे मायामीचे कार्याध्यक्ष जोर्ज मास म्हणाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

विराट कोहलीच्या टीम इंडियाबद्दल केलेले हे वक्तव्य रवी शास्त्रींना भोवले

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध