तब्बल १ वर्षाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या वॉर्नरचे नाव आता सन्मानाने सचिन-हेडनच्या यादीत घेतले जाणार

लंडन। आज(25 जून) 2019 विश्वचषकात 32 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात लॉर्ड्सच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने चांगली सुरुवात करत सुरुवातीलाच इंग्लंडला यश मिळू दिले नाही. त्यांनी सलामीला 123 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी मोईन अलीने वॉर्नरला 53 धावांवर बाद करत तोडली. वॉर्नर अर्धशतक करुन बाद झाला असला तरी त्याने या सामन्यात खास पराक्रम केला आहे.

वॉर्नरने 2019 विश्वचषकात खेळताना 500 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या या विश्वचषकात 7 सामन्यात 83.33 च्या सरासरीने 500 धावा झाल्या आहेत. त्यामुळे वॉर्नर हा एका विश्वचषकात 500 धावा पूर्ण करणारा एकूण पाचवा सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

याआधी सलामीला फलंदाजी करताना एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, मेथ्यू हेडन, तिलकरत्ने दिलशान आणि मार्टीन गप्टील यांनी पार केला आहे. विशेष म्हणजे सचिनने 1996 आणि 2003 या दोन विश्वचषकात खेळताना प्रत्येकी 500 धावांचा टप्पा पार केला आहे.

त्याचबरोबर आज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचलाही 2019 च्या विश्वचषकात 500 धावा पूर्ण करण्याची संधी होती. पण ही संधी त्याची केवळ 4 धावांनी हुकली आहे. तो 116 चेंडूत 100 धावा करुन बाद झाला. त्यामुळे त्याचे या विश्वचषकात 7 सामन्यात 70.85 च्या सरासरीने 496 धावा झाल्या आहेत.

एकाच विश्वचषकात 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे सलामीवीर –

1996 – सचिन तेंडूलकर (523 धावा)

2003 – सचिन तेंडूलकर (673 धावा)

2007 – मेथ्यू हेडन (659 धावा)

2011 – तिलकरत्ने दिलशान (500 धावा)

2015 – मार्टीन गप्टील (547 धावा)

2019 – डेव्हिड वाॅर्नर (500 धावा*)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रशिक्षकाची आत्महत्या करण्याची होती इच्छा

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!