डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी

डेविड वॉर्नरसाठी ऑस्ट्रलियन क्रिकेटचे दार सदा उघडेच आहे असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले. मेलबर्नमधील रेडिओ स्टेशनशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेतील चेंडू छेडछाणी प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नर आणि स्टिव स्मिथ या दोघांवर एक वर्षीची बंदी घातली आहे. तसेच त्यांचा सहकारी कॅमेरून बॅनक्रॉफ्टवरही नऊ महिन्यांची बंदी घातली आहे.

वॉर्नर हा या प्रकरणातील मुख्य दोषी असल्याने त्याला कधीच ऑस्ट्रलियाचे कर्णधारपद भुषविता येणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.

यावेळी तो पुढे देशासाठी खेळणार नाही असेही वॉर्नरने म्हटला होता. तसेच या तिघांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या.

“मला वाटते दुसऱ्या संधीसाठी सगळेच पात्र असतात आणि त्यांना ही संधी मिळावी. त्यांच्या भवितव्याचे रक्षण करणे हे त्यांच्याच हातात आहे,” असेही सदरलँड म्हणाले

“या बंदीच्या वेळे दरम्यान त्यांनी  स्वत:ला असे काही उत्कृष्ठ सिध्द करावे जेणेकरून संघ निवडकर्ते त्यांना संघात परत घेण्यास उत्सुक होतील.”

सदरलँड यांना या खेळांडूबद्दल वाईट वाटते आहे. यावेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली.

“मी त्यांच्यासाठी दु:खी असून त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांनी संघात परत येऊन आपला चांगला खेळ करावा अशी माझी इच्छा आहे आणि ते तसे करतील याबाबत मी ठाम आहे.”

“त्यांनी क्रिकेटचा भाग होण्यास आमची काहीही हरकत नाही. त्यांना सहकार्य करण्यामध्ये माझाही समावेश असून त्यांचे राज्यातील संघटना आणि क्लब्स याला आमचे सहकार्य असेल.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे अशा घटना होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. तसेच त्यांनी यामध्ये नैतिक सुधारणा यावी अशी नवीन योजना आखली आहे.

हि योजनेची स्थापना सिडनीचे कार्यकारी संचालक डॉ सिमॉन लॉग्जस्टाफ यांच्या देखरेखीखाली  करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…

 धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही

बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली