भावनिक डेविड वार्नरने केला हैद्राबादच्या खेळाडूंना खास संदेश

यावर्षीच्या आयपीएलचा भाग नसलेल्या डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैद्राबाद संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजच त्याने इंस्टाग्रामवरून हैद्राबाद संघाला राजस्थान रॉयल्स विरूध्दच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिलेली पोस्ट टाकली आहे.

वॉर्नर जरी संघाचा भाग नसला तरी त्याने संघाबद्दल असलेले प्रेम आणि आदर यामध्ये कमी दाखवलेली नाही, असेच या पोस्ट वरून दिसून येते.

दक्षिण आफ्रिकेमधील चेंडू छेडछाड प्रकरणामुळे बीसीसीआयने यावर्षीच्या त्याच्या आयपीएलमधील सहभागावर बंदी घातली आहे. त्यामुळे हैद्राबाद संघाला त्याचा बदली खेळाडू इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सची निवड केली आहे.

तसेच त्याने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर हैद्राबाद संघाचे कर्णधारपदही सोडले होते. यानंतर केन विलियमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराकडे हैद्राबादचेही नेतृत्व सोपवण्यात आले.

डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नर मुख्य सूत्रधार म्हणून आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

वॉर्नरने 2016च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादला पहिले विजेतेपद मिळवून दिले होते.