डेविड वॉर्नर मोडला कोहलीचा हा विक्रम

बेंगलोर । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने खणखणीत शतक केले. याबरोबर त्याने वनडेत पहिल्या १०० सामन्यात सार्वधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला.

हा सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर ९९ सामन्यात ४४ च्या सरासरीने ४०९३ धावा होत्या तर विराट कोहलीने पहिल्या १०० सामन्यात ४१०७ धावा केल्या होत्या.

आपले १४वे शतक करताना वॉर्नरने १०० सामन्यांत त्याने ४५च्या सरासरीने ४१९३ धावा केल्या आहेत, तर ग्रिनीज यांनी ४१७७ आणि व्हिव्हियन रिचर्ड यांनी ४१४६ धावा केल्या होत्या.

पहिल्या १०० वनडेत सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने १०० सामन्यात ४८०८ धावा केल्या आहेत.

पहिल्या १०० वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४८०८ अमला
४१९३ वॉर्नर
४१७७ ग्रिनीज
४१४६ रिचर्ड
४१०७ कोहली