चेंडू छेडछाड प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर झाला बांधकाम कामगार

चेंडू छेडछाड प्रकरणामुळे एक वर्षाची बंदी घालण्यात आलेला डेव्हिड वॉर्नर एका बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणुन काम करताना दिसुन आला आहे.

त्यातच त्याने बांधकाम साईटवर वापरली जाणरी टोपी घातली होती ज्यावर ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ आणि ‘अपरेंटिस सेलिब्रिटी’ असे लिहीले आहे.  त्यामुळे अनेकांचा गोंधळ झाला आहे.

पण खरंतर, वॉर्नर स्वत:च्याच घराचे बांधकाम करत आहे. त्याने डिसेंबर 2015 मध्ये सिडनी उपनगर मारुब्रा येथे समुद्रकिनारी 900 चौरस मीटरची जागा घेतली होती. याच ठिकाणी तो त्याच्या घराचे बांधकाम करत आहे.

वॉर्नर हे काम करत असलेला फोटो आणि व्हिडिओ त्याची पत्नी कँडिस वॉर्नरने सोशल मिडियावरून शेयर केला आहे.

या बांधकामाबद्दल त्याचे शेजारी म्हणाले, “काही महीने ट्रकची ये-जा चालू होती. पण मागील काही आठवडे काहीच हलचाल नव्हती. अम्हाला अपेक्षा आहे तो आत्ता हे बांधकाम करेल. त्याने काही वर्षांपुर्वी ही जागा घेतली होती. जी दिसायला खुप काही चांगली नव्हती.”

डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नर मुख्य सूत्रधार म्हणून आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच त्याने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर हैद्राबाद संघाचे कर्णधारपदही सोडले होते.