भारताचा डेव्हिस कप जागतिक गटातील सामना कॅनडाशी…

भारताचा डेव्हिस कप जागतिक गटातील सामना कॅनडाशी १५ ते १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत यापूर्वी कधीही कॅनडाशी डेव्हिस कपमध्ये खेळलेला नाही. ही लढत आयोजनाचा मान जागतिक क्रमवारीत भारतापुढे असणाऱ्या कॅनडाला नाणेफेकच्या आधारावर देण्यात आला आहे.

 

भारताने आशिया-ओशियाना ग्रुपमध्ये उझबेकिस्ताब संघावर ४-१ असा विजय गेल्या आठवड्यात मिळविला होता. याचबरोबर भारताने सलग ४ वेळा जागतिक गटात स्थान मिळविले. यापूर्वी भारत जागतिक गटात २०१४ला अमृतराज यांच्या नेतृत्वाखाली सर्बियाविरुद्ध, २०१५ ला झेक प्रजासत्ताक विरुद्ध तर, २०१६ ला दिल्ली येथे स्पेन विरुद्ध पराभूत झाला. पुढे स्पेनही सर्बियाकडून उपांत्यपूर्व फेरीत ४-१ असा पराभूत झाला. या वेळी भारताला अव्वल मानांकित संघांना जसे कि अर्जेन्टिना, जर्मनी, झेक प्रजासत्ताक सामना करावा लागणार नाही ही चांगली गोष्ट आहे.

 

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जागतिक गटाच्या पहिल्याच फेरीत कॅनडाला ब्रिटनकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. या वेळी लढतीच मुख्य आकर्षण हा ६ फूट ५ इंच उंचीचा मिलोस रावनिकच आहे जो गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. भारत जागतिक गटात खेळणारा एकेमव संघ आहे ज्याचा एकही खेळाडू एकेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये नाही. भारताकडून रामकुमार(२६९) प्रजनेश गुंनेश्वरन (२८६), युकी भाम्बरी (२८५) आणि साकेत मायनेनी(३३७) यातील कोणाला संधी मिळेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. .

 

या लढतीसाठी एकेरीत रामकुमार रामनाथनच्या साथीला साकेत मायनेनी, युकी भाम्बरी हेही तंदुरुस्त होऊन सामील होतील. आता सर्वांचे लक्ष आहे ते भारताचा कर्णधार महेश भूपतीवर. तो कोणत्या ४ खेळाडूंना या महत्वाच्या सामन्यासाठी स्थान देतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कॅनडाकडे एकेरी आणि दुहेरीत भारतापेक्षा अव्वल मानांकित खेळाडू आहे.

 

यूएस ओपनच्या समाप्तीनंतर लगेच आठवड्याभरात ह्या लढतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची बरीच दमछाक झालेली असेल.

 

ह्या लढतीमधील विजेता हा जागतिक गटात राहील तर पराभूत संघ पुन्हा रिजिनल गटात जाईल. कॅनडा सध्या जागतिक क्रमवारीत ६वा तर भारत १८वा आहे मोठ्या कालावधीनंतर भारताला जागतिक गटात परतण्याची मोठी संधी चालून आली आहे.