पहिल्या सरपंच चषक कबड्डी स्पर्धेत अतुलदादा बेनके स्पोर्ट्स क्लबचे पहिल्या दिवशी वर्चस्व

नारायणगाव । नारायणगाव वारुळवाडी समस्त ग्रामस्थ आयोजित जुन्नर कबड्डी लीग सरपंच चषकच्या पहिल्या पर्वास काल सुरुवात झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि प्रेक्षकांच्या खचाखच भरलेल्या शिवमुक्ताई क्रीडानगरी स्टेडियममध्ये या स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात पार पडले.

उदघाटनाच्या सामन्यांत (१५ – ११) ४ गुणांनी श्री गणेश फायटर्स या संघाने विजयी श्री गणेशा केला. त्यांनी स्वराज्य वॉरियर्स हिवरे या संघाचा पराभव केला.

तर दुसऱ्या सामन्यात अतुलदादा बेनके स्पोर्ट्स क्लब या संघाने तब्बल (२६ – १२) १४ गुणांनी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान संघाचा पराभव करत विजयी सुरुवात केली.

भागेश्वर गटातील इतर सामन्यांमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान विरुद्ध गणपिर चॅम्पियन्स हा कालच्या दिवसाचा शेवटचा सामना रोमहर्षक (१७ – १४) पध्द्तीने जिंकला.

तर याच गटातील अतुलदादा बेनके स्पोर्ट्स क्लब वि. शिवस्वराज्य चॅलेंजर्स हा साखळी सामना अतिशय उत्कंठावर्धक झाला.

या सामन्यात अतुलदादा संघाचा कर्णधार मयुर तांबोळी आणि सागर तांबोळी हे दोन मातब्बर खेळाडू आणि भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. हा सामना २०-२० असा टाय झाला.

याचवेळी मुक्ताई गटातील ओमसाई टायगर्स आणि श्रीगणेश फायटर्स या संघांमधील सामनाही (१८-१८) असा टाय झाला त्यामुळे प्रेक्षकांना एकाचवेळी दोन टाय झालेल्या अतिशय चुरशीच्या लढती पाहण्यास मिळाल्या.

भागेश्वर गटातून अतुलदादा बेनके स्पोर्ट्स क्लब ५ गुण तर गणपिर चॅम्पियन्स ४ गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

या गटातील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान – २ गुणांसह तर शिव स्वराज्य चॅलेंजर्स – १ गुण हे संघ कॉलबॅक राऊंडमध्ये खेळतील आणि मुक्ताई गटातून अोमसाई टायगर्स – ५ गुण आणि सचिन स्पार्टस – ४ गुण घेऊन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

या गटातील सुमार कामगिरीमुळे प्रेक्षकांना निराश केलेल्या स्वराज्य वाॅरियर्सला मात्र अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे हा संघ आणि काहीशी चांगली कामगिरी करणारा आणि प्रेक्षाकांचा उस्फुर्त पाठिंबा मिळवणारा श्री गणेश फायटर्स – ३ गुण हे संघ आज कॉलबॅकमध्ये आज खेळतील.

आज कॉलबॅक राऊंड्स आणि सुपर सिक्सच्या मॅचेसची मेजवानी प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजही स्टेडियममध्ये तुफान गर्दी अनुभवायला मिळेल.

पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंतचे गुणपत्रक खालीलप्रमाणे

भागेश्वर ग्रुप
१) अतुलदादा बेनके – ५ गुण
२) गणपीर चॅम्पीयन्स – ४ गुण
३) राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान – २ गुण
४) शिव स्वराज्य चॅलेंजर्स – १ गुण

मुक्ताई ग्रुप
१) अोमसाई टायगर्स – ५ गुण
२) सचिन स्पोर्ट्स – ४ गुण
३) श्री गणेश फायटर्स – ३ गुण
४) स्वराज्य वाॅरियर्स – ० गुण

काॅलबॅक संघ
१) श्री गणेश फायटर्स – ३ गुण
२) राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान – २ गुण
३) शिव स्वराज्य चॅलेंजर्स – १ गुण
४) स्वराज्य वाॅरियर्स – ० गुण

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी

पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने

-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा