फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी होणारे सामने

मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या दिवशी १० सामने होणार असून यात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाच्या एका सामन्याचा समावेश आहे.

आज पुरुषांचे सामने संध्याकाळी ५ वाजता सुरु होणार असून याच वेळी दुसऱ्या मॅटवर महिलांचे सामने सुरु होणार आहेत. पुरुष गटात आज महाराष्ट्राचा सामना हा ५वा आणि शेवटचा असून राजस्थान संघासोबत होणार आहे.

महिलांच्या गटात आज महाराष्ट्राच्या महिलांचा सामना हरियाणाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे.

आजचे सामने:
पुरुष गट:
३.हरियाणा विरुद्ध उत्तरप्रदेश, अ गट
४.सेनादल विरुद्ध भारतीय रेल्वे, ब गट
५. हरियाणा विरुद्ध राजस्थान, अ गट
६. भारतीय रेल्वे विरुद्ध कर्नाटक, ब गट
७. महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान, अ गट

महिला गट
३.भारतीय रेल्वे विरुद्ध हरियाणा, ब गट
४. हिमाचल प्रदेश विरुद्ध पंजाब, अ गट
५. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा, ब गट
६. छत्तीसगढ विरुद्ध हिमाचल प्रदेश, अ गट
७. उत्तर प्रदेश विरुद्ध पंजाब, अ गट