Timetable: आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणार हे सामने

हैद्राबाद । काल ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व महिलांच्या उपांत्यपूर्व आणि उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. त्यात महाराष्ट्राच्या महिला संघांचे आव्हान हिमाचल प्रदेशने संपुष्ठात आणले. संघाला केवळ ४ गुणांनी पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे अंतिम ४ संघात स्थान मिळवता आले नाही.

महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने मात्र अंतिम ८ संघात स्थान मिळवले. काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ४३-३५ असा पराभव केला.

आज संध्याकाळच्या सत्रात पुरुषांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. हे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि हॉटस्टार या अँपवर दाखवण्यात येणार आहेत.

आज होणारे पुरुषांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने

सामना १: कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड, संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी

सामना २: उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र, संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी

सामना ३: हरियाणा विरुद्ध राजस्थान, संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी

सामना ४: सेनादल विरुद्ध रेल्वे, रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी