दिल्ली क्रिकेट बोर्डाचा टीव्ही चोरीमधील आरोपी कर्मचाऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू…

फिरोजशाह कोटला मैदानावर ड्रेसिंग रूममध्ये केअर टेकर म्हणून काम पाहणाऱ्या रतन सिंग या कर्मचाऱ्याचा आज राहत्या घरी हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आढळले. काही दिवसांपूर्वीच तो ड्रेसिंग रूममधून टेलिव्हिजन सेट चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले होते.

 

हा सर्व प्रकार सध्या कोर्टाने दिल्ली क्रिकेट बोर्डावर नियुक्त केलेल्या माजी न्यायाधीश विक्रमसिंग सेन यांच्या ध्यानात आला. त्यांच्या आदेशाप्रमाणे गुरुवारी रतन सिंगवर मध्य दिल्लीमधील आयपी इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये केस आली तसेच पोलिसांना घटनेचे फुटेजही देण्यात आले होते.

 

पोलीस रतन सिंगवरला चौकशीसाठी शुक्रवारी बोलवणारही होते परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी त्याला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले.

 

सिंग गेली १५ वर्ष दिल्ली क्रिकेट बोर्डात फिरोजशाह कोटला मैदानावर काम करत होता. तो बिकटआर्थिक परिस्थितीतून जात असल्याचा आणि तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.