तब्बल १३ दिवसांनी आयपीएलमध्ये पडले पहिले निर्धाव षटक

कोलकाता | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामन्यात कोलकाताने काल ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात नितीश राणाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. 

असे असले तरी दिल्ली कडून या सामन्यात ट्रेंट बोल्ट या गोलंदाजाने एक खाय विक्रम केला. आयपीएल २०१८मधील पहिले निर्धाव षटक या खेळाडूने दिल्लीकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टाकले. 

विशेष म्हणजे हे करताना त्याने चक्क सलग १० चेंडूवर एकही धाव दिली नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या ख्रिस लीनला त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात एकही धाव काढून दिली नाही. 

त्यानंतर तिसऱ्या षटकात पहिले ३ चेंडू निर्धाव टाकताना सुनील नारायणला एकही धाव काढू दिली नाही. तसेच तिसऱ्या चेंडूवर त्याला बाद केले. त्यानंतर चौथा चेंडू राॅबीन उथप्पाला निर्धाव टाकला. 

अशा प्रकारे चक्क १० चेंडू काल या गोलंदाजाने निर्धाव टाकले. यामूळे तो काहीवेळ सोशल मिडीयावर चांगलाच ट्रेंड झाला होता.