सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन अ संघाला विजेतेपद

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात डेक्कन अ संघाने सोलारिस आरपीटीए संघाचा 24-4असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत डेक्कन अ संघाने सोलारिस आरपीटीए संघावर 24-4अशा फरकाने विजय मिळवला. सामन्यात 100अधिक गटात डेक्कनच्या नंदन बाळ व जयदीप दाते या जोडीने सोलारिस आरपीटीए संघाच्या रवींद्र कात्रे व हेमंत भोसले यांचा 6-0असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या संग्राम चाफेकर व ऋषिकेश पाटसकर यांनी सोलारिस आरपीटीए संघाच्या रवींद्र पांडे व कैफी अफजल या जोडीचा 6-2असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर 90अधिक गटात डेक्कनच्या मुकुंद जोशीने अजय कामतच्या साथीत सोलारिसच्या राजेंद्र देशमुख व सिद्धू भरमगोंडे यांचा 6-0असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या जयदीप दाते व मदन गोखले या जोडीने सोलारीसच्या संजीव घोलप व हेमंत भोसले यांचा 6-2असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: प्लेट डिव्हिजन गट:

डेक्कन अ वि.वि.सोलारिस आरपीटीए 24-4(100अधिक गट: नंदन बाळ/जयदीप दाते वि.वि.रवींद्र कात्रे/हेमंत भोसले 6-0; खुला गट: संग्राम चाफेकर/ऋषिकेश पाटसकर वि.वि.रवींद्र पांडे/कैफी अफजल 6-2; 90अधिक गट: मुकुंद जोशी/अजय कामत वि.वि.राजेंद्र देशमुख/सिद्धू भरमगोंडे 6-0; खुला गट: जयदीप दाते/मदन गोखले वि.वि.संजीव घोलप/हेमंत भोसले 6-2)