आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स, पीवायसी क, महाराष्ट्र मंडळ संघांचे विजय

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, पीवायसी क, लॉ कॉलेज लायन्स आणि महाराष्ट्र मंडळ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात डेक्कन ड संघाने एमडब्लूटीए क संघाचा 21-13असा पराभव केला.

विजयी संघाकडून राजीव पागे, आशिष पुंगलिया, विभाष वैद्य, जितेंद्र जोशी, अजय जाधव, संजय कामत यांनी विजयी कामगिरी केली. लॉ कॉलेज लायन्स संघाने महाराष्ट्र मंडळ संघावर 20-10असा विजय मिळवला. पीवायसी क संघाने नवसह्याद्री डायनामाईट्स संघाचा 24-12 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन
डेक्कन ड वि.वि.एमडब्लूटीए क 21-13 (100अधिक गट: राजीव पागे/आशिष पुंगलिया वि.वि.सलीम वाडीवाला/अजय चौहान 6-2; खुला गट: विभाष वैद्य/जितेंद्र जोशी वि.वि.अजय चौहान/अंकित डागा 6-2; 90अधिक गट: अजय जाधव/संजय कामत वि.वि.संजय आशेर/शायनी बॅरेटो 6-3; खुला गट: आशिष पुंगलिया/पराग देसाई पराभूत वि.पार्थ मोहपात्रा/विक्रम गुलानी 3-6);

लॉ कॉलेज लायन्स वि.वि. महाराष्ट्र मंडळ 20-10 (100अधिक गट: दिगंबर गोखले/केतन जठार वि.वि.हरीश देसाई/धनंजय पूर्वत 6-0; खुला गट: अभिजित मराठे/सतीश ओरसे वि.वि.विलास बचलू/अभिजित कदम 6-1; 90अधिक गट: शिवाजी यादव/संतोष जयभाई पराभूत वि.संजय शेट्टी/अर्पित श्रॉफ 2-6; खुला गट: तारक पारीख/ केतन जठार वि.वि.अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ 6-3);

पीवायसी क वि.वि.नवसह्याद्री डायनामाईट्स 24-12(100अधिक गट: डॉ.राजेंद्र साठे/अमित लाटे वि.वि.किशोर स्वामी/आशिष डिके 6-3; खुला गट: अमोघ बेहेरे/सारंग देवी वि.वि.रोहन राजापूरकर/आदित्य जोशी 6-3; 90अधिक गट: हर्ष हळबे/ध्रुव मेड वि.वि.उमेश भिडे/रमेश पाटणकर 6-2; खुला गट: अमित लाटे/अभिषेक सोमण वि.वि.गजानन कुलकर्णी/आशिष डिके 6-4);

महाराष्ट्र मंडळ वि.वि.ओडीएमटी अ 20-10(100अधिक गट: संजय सेठी/हरीश सिरपळ पराभूत वि.संतोष कुराडे/उदय गुप्ते 2-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ वि.वि.चंदन निगुडकर/कोनार कुमार 6-0; 90अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू वि.वि.अतुल मांडवकर/नितीन सिंघवी 6-2; खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.बिनेश राजन/सुहास मापारी 6-2).