जाणून घ्या भारतात होणाऱ्या ‘डे-नाईट टेस्ट’ बद्दल काय झाला निर्णय?

दिल्ली । भारतीय क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी भारतात होणाऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. याबद्दल बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“मला दिवसरात्र कसोटी सामन्याबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल. याला आता जास्त वेळ घेतला जाणार नाही. परंतु अफगाणिस्तानबरोबर होणारा पहिला कसोटी सामना नक्कीच दिवस रात्र कसोटी सामना नसेल. ” असे चौधरी म्हणाले.

भारत अफगाणिस्तानबरोबर १४-१८ जून दरम्यान बेंगलोर येथे एकमेव आणि अफगाणिस्तानसाठीचा पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

सध्या जगातील १२ पैकी ८ देश हे कसोटी सामने खेळले असून भारतासारखा क्रिकेटमधील बलाढ्य देश मात्र असा सामना खेळला नाही हे विशेष.

न्यूझीलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१५मध्ये पहिला डे-नाईट सामना खेळला गेला असून आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये एकूण ९ डे-नाईट सामने झाले आहेत.