पाकिस्तानला एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पराभूत करणे ही खास गोष्ट- नितीन तोमर

गेल्या वर्षी गोरगन, इराण येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत करणे ही सर्वात खास गोष्ट असल्याचे कबड्डी स्टार नितीन तोमरने म्हटले आहे.

स्पोर्टसकिडाशी बोलताना नितीन तोमरने एशियन कबड्डी चॅम्पियनशिप अनेक आठवनींना उजाळा दिला. ” इराणमध्ये खेळताना मजा आली आम्हाला खेळाडूंची भाषा समजत नव्हती परंतु त्या खेळाडूंना भेटण्यात एक वेगळाच आनंद होता. ” असे तोमर म्हणाला.

“पाकिस्तानला पराभूत करणे ही खास गोष्ट होती. ते मॅट बाहेर आमचे चांगले मित्र होते परंतु मैदानावर आम्ही पूर्णपणे प्रतिस्पर्धी म्हणूनच खेळलो. क्रिकेटप्रमाणेच कबड्डी खेळातही पाकिस्तानकडे तसेच पाहिले जाते. ” असेही तो पुढे म्हणाला.

प्रो कबड्डी स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू म्हणून नितीन तोमरकडे पाहिले जाते. त्याला यावर्षी युपी योद्धाज संघाने तब्बल ९३ लाख खर्च करून संघात घेतले होते.