यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

कोलकता। शुक्रवारी(12 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 26 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक रिषभ पंतने अफलातून झेल घेतला आहे. त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या कोलकता संघाचा फलंदाज रॉबीन उथप्पाचा शानदार झेल घेत त्याला बाद केले.

उथप्पाने 9 व्या षटकात कागिसो रबाडाने टाकलेल्या बाउंसरवर चेंडूला फाइन लेगला मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटीच्या पुढीच्या बाजूला लागुन पंतच्या बाजूला गेला. थोडी उंचीवर गेलेला हा चेंडू उडी मारत पंतने पकडला आणि उथप्पा 28 धावांवर बाद झाला.

विशेष म्हणजे आयपीएल 2019 मध्येच दिल्लीमध्ये या दोन संघात पार पडलेल्या सामन्यात साधारण असाच झेल पंतने पकडला होत्या. त्यावेळीही रबाडा गोलंदाजी करत होता. तर कोलकताकडून ख्रिस लिन फलंदाजी करत होता. पंतने लिनचा एका हाताने झेल घेतला होता.

पंतच्या या दोन्ही झेलांचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 178 धावा केल्या. त्यांच्याकडून शुबमन गिलने 65 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसलने 45 धावा केल्या.

179 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार नाबाद 97 धावांची खेळी केली आणि दिल्लीला या मोसमातील चौथा विजय मिळवून दिला. त्याला रिषभ पंतने फलंदाजीत 46 धावा करत चांगली साथ दिली.

गोलंदाजीमध्ये दिल्लीकडून ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा आणि किमो पॉलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच इशांत शर्माने 1 विकेट घेतली. कोलकताकडून नितीश राणा, प्रसिद्ध क्रिष्णा आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्ससाठी आजचा ऐतिहासिक सामना, जाणून घ्या कारण

रोहित शर्माचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागम, असा आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध ११ जणांचा संघ

‘नो बॉल’ विवाद प्रकरणी सौरव गांगुलीचा एमएस धोनीला पाठिंबा…