प्रीमियर लीग: टोटेनहॅमकडून न्युकॅसलचा २-१ने पराभव

प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव केला.

या सामन्याच्या पहिल्याच सत्रात हे तीन गोल झाले. यामध्ये टोटेनहॅमच्या जॅन वेर्टोनघेनने ८व्या आणि डेले अलीने १८व्या तर न्युकॅसलच्या जोसेलूने ११व्या मिनिटाला गोल केले.

ट्रान्सफर विंडोमध्ये टोटेनहॅम क्लब तेवढा सहभागी नव्हता. मात्र सतत दोन वेळा प्रीमियर लीगच्या हंगामात विजयी सुरूवात करून त्यांनी दाखवून दिले की या विंडोचा त्यांना काहीही फरक पडला नाही.

तोटेनहॅमचा मिडफिल्डर क्रिस्टीयन एरिकसनने सामन्याच्या ८व्या मिनिटालाच बॉल डेविनसन सॅनचेझकडे पास केला पण वेर्टोनघेनने हा गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

न्युकॅसलनेही चांगला बचाव केला. सॅनचेझ आणि वेर्टोनघेन हे दोघे आजच्या सामन्यात मैदानावर अग्रेसर होते. म्हणून न्युकॅस्टलने या दोघांना अडवून धरले होते. याचाच फायदा घेत जोसेलूने मिडफिल्डर मॅट रिटचीच्या साहय्याने  ११व्या मिनिटाला गोल करताना सामना १-१ असा बरोबरीत आणला.

मात्र १८व्या मिनिटालाच डेलेने केलेल्या हेडर शॉटवर तोटेनहॅमला २-१ अशी आघाडी मिळाली. सामन्याच्या पहिल्याच सत्रात तीन गोल झाले असल्याने बाकीच्या वेळात दोन्ही संघानी बचावात्मक पवित्रा घेतला होता.

फिफा विश्वचषक २०१८चा गोल्डन बूट विजेता हॅरी केनला या सामन्यात एकही गोल न करता आल्याने चाहत्यांची निराशा झाली.

तसेच तोटेनहॅमचा या लीगचा पुढील सामना फुलहॅम विरुद्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा अर्जुन तेंडुलकर बनतो विक्रेता

लाॅर्ड्स कसोटीत बॅट न चाललेल्या कोहलीचा एक खास विक्रम