कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका

दिल्ली | काल दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने तब्बल ५५ धावांनी विजय मिळवला. दिल्ली डेअरडेविल्स नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावार त्यांनी हा विजय मिळवला. 

अय्यरने काल ४० चेंडूत १० षटकार आणि ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ९३ धावा केल्या. यामुळे दिल्लीला २० षटकांत ४ बाद २१९ धावा करता आल्या. तर कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १६४ धावा करता आल्या. 

या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने अनेक विक्रम केले. त्यातील काही खास-

९३ धावा- कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने पदार्पण करताना केलेल्या सर्वोच्च धावा, अॅराॅन फिंचने २०१३ मध्ये कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात पुण्याकडून ६४ धावा केल्या होत्या. 

९३ धावा- श्रेयस अय्यरने कालच्या सामन्यात केलेल्या धावा तर २०१८ आय़पीएलमध्ये ५ सामन्यात गंभीरने ८५ धावा केल्या.

९३ धावा- पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा केवळ चौथा कर्णधार, यापुर्वी अॅराॅन फिंच, मुरली विजय आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी हा पराक्रम केला आहे. 

१० षटकार- दिल्लीकडून खेळताना आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार

१० षटकार- कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार, श्रेयस अय्यर सोडून कोणत्याही कर्णधाराला हा विक्रम आजपर्यंत करता आला नाही. 

१० षटकार- एवढे षटकार मारूनही शतक न झालेला आयपीएलमधील श्रेयस अय्यर तिसरा खेळाडू, यापुर्वी आंद्रे रसेल आणि संजू सॅमसनने योगायोगाने हाच पराक्रम याच आय़पीएलमध्ये केला. 

२३ वर्ष १४२ दिवस-  दिल्ली डेअरडेविल्सचा आजपर्यंतचा सर्वात तरुण कर्णधार, २४ वर्ष २९१ दिवस- दिनेश कार्तिक

महत्त्वाच्या बातम्या –

भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर

पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब

आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग