२०१९च्या आयपीएलपासून दिल्ली डेयरडेविल्स ओळखले जाणार या नवीन नावाने

2019चा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी (इंडियन प्रीमियर लीग) दिल्ली डेयरडेविल्स या संघाचे नामकरण झाले आहे. आता या संघाचे नाव दिल्ली कॅपिटल्स असे असणार आहे.

जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यु स्पोर्ट्स हे या दिल्ली संघाचे नवे मालक असून त्यांनी आज संघाचे नवीन नाव घोषित केले. तसेच हे बदलेले नाव भारतामधील युबीए बास्केटबॉल लीगच्या एका संघाचेही आहे.

बेंगलुरू एफसीचे मालक असलेल्या जेएसडब्ल्यु स्पोर्ट्सने या वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्ली संघाचे 50% शेयर्स विकत घेतले होते. तसेच या संघातून 18 डिसेंबरला होणाऱ्या लिलावासाठी गौतम गंभीरला मुक्त केले आहे. तर जेसन रॉय, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी अशा मोठ्या खेळाडूंनाही मुक्त केले आहे.

2008पासून सुरू झालेल्या आयपीएलचे 2019चे 12वा हंगाम आहे. या सर्व मोसमात दिल्लीने सहभाग घेतला असून त्यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आता त्यांना नवीन हंगामात चांगली सुरूवात करण्याची अपेक्षा आहे.

दिल्लीच्या संघात शिखर धवनचा समावेश करण्यात आला आहे. याआधी तो सनरायजर्स हैद्राबाद या संघाकडून खेळत होता. तसेच रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हा तरूण खेळांडूचाही या संघात समावेश आहे. या संघाचे नेतृत्व अय्यर करणार आहे.

मोहम्मद कैफला दिल्ली संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर रिकी पॉटींग मुख्य प्रशिक्षक पदावर कायम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९च्या लिलावासाठी या शहरावर झाले शिक्कामोर्तब

सहा वर्षाच्या चिमुकल्याचा भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात समावेश

आॅस्ट्रेलियन भूमीत या संघाने आॅस्ट्रेलिया विरुद्ध मिळवले आहेत सर्वाधिक कसोटी विजय