कबड्डीसाठी येणार अच्छे दिन

भारतीय कबड्डी महासंघावरच्या जनार्दनसिंग गेहलोत आणि गेहलोत कुटूंबाच्या वर्चस्वाला दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (3 ऑगस्ट) जोरदार धक्का दिला आहे.

भारतीय कबड्डी महासंघाच्या अजीवन अध्यक्षपदावरुन जनार्दनसिंग गेहलोत तर गेहलोत यांच्या पत्नी मृदुल भदौरिया यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय दिला आहे.

तसेच न्यायालयाने हा निर्णय देताना गेललोत यांनी भारतीय कबड्डी महासंघाचा कौटूंबिक मालमत्ता असल्याप्रामाणे वापर केला अशी टीका केली आहे.

न्यायालयाने भारतीय कबड्डी महासंघाची कार्यकारणी बरखास्त करुन येत्या 6 महिन्यात नव्या कार्यकारणीसाठी निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.

जनार्दनसिंग गेहलोत यांनी त्यांच्या लाभासाठी राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन करत घटनेत आजीवन अध्यक्ष पदाची कोणतीही तरतूद नसताना अाजीवन हे पद निर्माण केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम