दिल्ली उच्च न्यायालयाकडून नेहराला खास भेट !

दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयाने वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या मागणीला समंती दिली आहे. आपल्या निवृत्तीच्या सामन्यात नेहराचे नातेवाईक आणि मित्र आता कॉर्पोरेट बॉक्समधून त्याचा हा सामना पाहू शकतात. 

दिल्ली क्रिकेट असोशिएशनवर सध्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले माजी न्यायाधीश विक्रमजीत सेन मुख्य व्यवस्थापक म्ह्णून काम पाहतात. 

दिल्ली खंडपीठाच्या रवींद्र भट आणि संजीव सचदेव यांनी हा निर्णय दिला. नेहरा १ नोव्हेंबर रोजी आपला शेवटचा सामना येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळणार आहे. तो भारत आणि न्यूजीलँड मालिकेतील पहिला टी२० सामना असेल. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर निवृत्ती घेणारा नेहरा केवळ दुसरा भारतीय खेळाडू बनणार आहे.