इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- दिलेर दिल्ली संघाचा मुंबई चे राजे संघावर 45-36 असा विजय

पुणे । सुनिल जयपाल, हरदीप चिल्लरच्या चढाया तर, विपुल मोकल व विनोद कुमार यांनी बचावात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत दिलेर दिल्ली संघाने मुंबई चे राजे संघाला 45-36 असे पराभूत केले.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या या सामन्यात दिलेर दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व प्रस्थापित केले. सुनिल जयपालने चढाईत चमक दाखवत संघाला पहिल्या क्वॉर्टरमध्ये 13-6 अशी आघाडी मिळवून दिली. दुस-या क्वॉर्टरमध्ये देखील दिल्लीच्या संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. सुनिलने चढाईत गुण मिळवले त्यासोबतच बचावात देखील विनोद कुमार व संदीप चिल्लर याने चमक दाखवल दुसरे क्वॉर्टर 15-6 असे आपल्या नावे करत मध्यंतरापर्यंत दिल्लीला 28-12 अशी आघाडी मिळवून दिली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाचे सामन्यात पुनरागमन करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. राशिद शेखने बचावात तर, महेश मगदुमने चढाईत चुणुक दाखवली त्यामुळे तिसरे क्वॉर्टर मुंबईने 10-5 असे आपल्या नावे केले. असे असले तरीही दिलेर दिल्ली संघाकडे 33-22 अशी आघाडी होती. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाने मुंबईला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.त्यांच्या मुकेश जगलान व विपुल मोकल यांनी बचावात संघासाठी गुण मिळवले. पण, मुंबई चे राजे संघाने या क्वॉर्टरमध्ये जोर लावत 14-12 अशी बाजी मारली पण, सामना दिल्लीच्या संघाने जिंकला.

शुक्रवारचे सामने :
– पुणे प्राईड वि.पाँडीचेरी प्रिडेटर्स (21 वा सामना ) (8 -9 वाजता)
– हरयाणा हिरोज वि.बंगळूरु रायनोज (22 वा सामना ) (9-10 वाजता)
– दिलेर दिल्ली वि.तेलुगु बुल्स (23 वा सामना ) (10-11 वाजता)