अमेरीकेच्या बिगरमानांकित खेळाडूने पीव्ही सिंधुला दाखवला घरचा रस्ता

भारताची बॅडमिंटन खेळा़डू पीव्ही सिंधुला डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बिवेन झांग या अमेरीकेच्या बिगर मानांकित खेळाडूने सिंधुचा पराभव केला आहे.

आज (16 आॅक्टोबर) झालेल्या सामन्यात बिवेन झांगने अनपेक्षित निकालाची नोंद लावली. या सामन्यात सिंधुला  17-21, 21-16,18-21 असा पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्यात सुरुवातीपासूनच झांगने आक्रमक खेळ करत पहिला सेट आपल्या नावावर केला होता. दुसऱ्या सेटमध्ये सिंधुने पुनरागमन करत 21-16 सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये झांगने मुसंडी मारत 21-17 सेट जिंकला.

सामन्यातील खरी चुरस तिसऱ्या सेट मध्ये निर्माण झाली होती. झांगने सुरुवातीलाच 12-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यानंतर सिंधुने ही आघाडी 14-13 अशी कमी केली होती. सामन्यात शेवटी झांगने सिंधुला 21-18 ने नमवत पुढच्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. झांगने सलग तिसऱ्यांदा सिंधुचा पराभव केला आहे.

सायना नेहवालने हाॅंगकाॅंगच्या चेऊंग गान यी हीचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-